शाळा बद्दलची माहिती

शाळेचा इतिहास

गोखले एजुकेशन सोसायटीच्या एस.एम.आर.के.-बी.के.-ए.के महिला महाविद्यालयाच्या हयुमन डेव्हलपमेंट विभागाच्या सहाय्यतेसाठी व मार्गदर्शनाखाली जून १९९२ मध्ये मा. सर डॉ.मो.स.गोसावी, सचिव, गोखले एजुकेशन सोसायटी, यांच्या प्रेरणेने माधवराव लेले विद्यालय, पूर्व प्राथमिक विभाग सुरु करण्यात आला. श्रीमती मनिषाताई लेले यांनी इमारत बांधण्यासाठी देणगी दिली. सन १९९६ पासून सन २००० पर्यंत  इ.१ ली ते ४ थी या वर्गांना शासन मान्यता मिळाली आहे. सन १९९८ पासून उच्च प्राथमिक विभाग सुरु करण्यात आला. सन २००२ ला त्यास शासन मान्यता मिळाली. सन १९९२ पासून सन २००० पर्यंत सौ. सुमित्रा गुप्ते निवृत्ती मुख्याध्यापिका विवेकानंद इंग्लिश मिडियम स्कूल, नाशिक या संस्थापक संचालिका म्हणून काम पहात होत्या. शासन निकषानुसार सन २००० पासून प्रथम प्रभारी मुख्याध्यापक श्री. विनोद देशपांडे यांची नेमणूक करण्यात आली. विनाअनुदान तत्त्वावर चालू असलेल्या विद्यालयाला सन २००७ पासून प्राथमिक विभागला अनुदान, तर सन २०१० पासून उच्च प्राथमिक  विभागाला अनुदान मिळाले आहे. वाढती विद्यार्थी संख्या लक्षात घेता इ.१ली ते इ. ७वीची दुसरी तुकडी सुरु करण्यात आली. त्यास सन २०१२ पासून शासन मान्यता मिळाली आहे. सन २०१४-१५ पासून इ. ३री व इ.५वी पासून सेमी इंग्रजी वर्ग देखील सुरु करण्यात आला आहे. आजमितीस शाळेत इ. १ ते ७वीचे १४वर्ग सुरु आहेत. त्यातून ७७० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत व १५ शिक्षक अध्यापनाचे कार्य करत आहेत आणि पूर्व प्राथमिक विभाग ५ वर्ग असून १७८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत ५ शिक्षिका अध्यापनाचे कार्य करत आहेत.

शाळेची स्थापना :- जून १९९२

शाळेचे देणगीदार :- श्रीमती मनिषाताई माधवराव लेले